संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खाला केलेला उपदेश त्याच्या कोपाला कारण होणे

उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये ।
पयःपानं भुजङ्गानां केवल विषवर्धनम् ॥

– पञ्चतन्त्र, तन्त्र १, कथा १७, सुभाषित ३

अर्थ : मूर्खाला केलेला उपदेश हा त्याच्या कोपाला कारण होतो, शांततेला नाही. सापाला दूध पाजले, तर त्याचे विष होते. मूर्खाला उपदेश करूनसुद्धा उपयोग नसतो. मूर्खाला केलेला उपदेश, म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. उलट अशा उपदेशाने त्याला राग येतो. – पञ्चतन्त्र, तन्त्र १


साहित्य, संगीत आणि कला याचे ज्ञान नसणारा मूर्ख पशुवत असणे 

साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात् पशुः पुच्छविषाणहीनः ।
तृणं न खादन्नपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥

– नीतीशतक, श्लोक ११

अर्थ : साहित्यशास्त्र (वाङ्मय), संगीत आणि कला यांचे ज्ञान नसलेला मनुष्य म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशूच होय. तो गवत न खाताही जगतो, हे पशूंचे मोठे भाग्य होय.’ – नीतीशतक, श्लोक ११