संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खाचे हृदय कळणे अशक्य असणे

ॐ लभेत सिकतासु तैलमपि यत्नत: पीडयन् 
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दित: ।

कदाचिदपि पर्यटन् शशविषाणमासादयेत्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥

– नीतीशतक, श्लोक ५

अर्थ : वाळू पिळून प्रयत्नाने त्यातून तेलही काढता येऊ शकेल, तहानेने व्याकूळ झालेला मृगजळातील पाणी पिऊ शकेल, कदाचित् (वनात) भटकून सशाचे कान मिळू शकेल; परंतु हट्टी अन् मूर्ख माणसाच्या मनाचे समाधान कुणीही करू शकणार नाही.