‘हिराबाग वॉटर वर्क्स’ पाणीपुरवठा केंद्र आहे कि कचरा टाकण्याचे मैदान ! – स्वाती शिंदे, नगरसेविका

‘हिराबाग वॉटर वर्क्स’ परिसरात महापालिकेने कचर्‍याचे मैदान केले असून प्रभागांतील कचरा येथे टाकला जातो. यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना त्रास होतो.

सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा ! – दत्तात्रय भरणे, वन राज्यमंत्री

सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कुंपण उभारणे, जल मृदसंधारण करणे, गवत कुरण विकास करणे, वन वणवा नियंत्रण ही कामे प्राधान्याने करून तसेच स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून तात्काळ मार्गी लावावीत..

‘माझी वसुंधरा’ अभियानात अमृत गटामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय !

याचे पारितोषिक वितरण ५ जून या दिवशी टाटा थिएटर, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांडातील दोषींना शिक्षा होण्यासाठी शासन ठोस पावले उचलेल ! – आमदार मनीषा कायंदे, शिवसेना

म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांडाविषयी सर्व माहिती घेतली असून दोषींना शिक्षा होण्यासाठी शासन ठोस पावले उचलेल – शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे

सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधारा पाडण्यात येऊ नये यांसाठी सर्वपक्षीय विरोध !

कृष्णा नदीवर म्हैशाळ येथे मोठा बंधारा बांधण्यात येणार असून त्यासाठी सांगलीचा बंधारा पाडण्यात येणार आहे. याला सर्वपक्षीय आणि समस्त सांगलीकर नागरिक यांचा विरोध !

कोयना धरणात केवळ २० ‘टी.एम्.सी.’ पाणीसाठा !

सातारा, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी पिण्याचे पाणी आणि शेती यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कोयना धरणात २ जून या दिवशी केवळ २० ‘टी.एम्.सी.’ (साठा क्षमता १०५.२५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा शिल्लक आहे.

जोशपूर्ण घोषणांनी हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून दुमदुमली सांगली नगरी !

श्री गणेशाच्या पावन नगरी सांगलीमध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २५ मे या दिवशी हिंदू एकता दिंडी काढली गेली.

नागरिकांनी प्लास्टिक कचरा गटारात टाकू नये !

महापालिकेच्या वतीने पावसाळापूर्व नालेसफाईची मोहीम चालू आहे. प्रत्येक चेंबरमधून प्लास्टिक कचरा निघत असल्यामुळे नागरिकांनी तो गटारामध्ये न टाकता महापालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

अडीच वर्षांच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, भाजप

अडीच वर्षांच्या कालावधीत महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या समस्या यांसह सर्वच आघाड्यांवर  महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलेले आहे. या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पहाण्यास वेळ नसून हे सरकार स्थानांतरण आणि वसुली यातच मग्न आहे…