बासरीवादनातून संगीतसाधना, क्रियायोगाची ध्यानसाधना आणि चिन्मय मिशनची ज्ञानसाधना करून सतत आनंदाची अनुभूती घेणारे सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा !
१२.८.२०१९ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी पंडित हिमांशु नंदा यांची त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी सुश्री (कु.) तेजल यांनी त्यांच्या संगीत साधनेविषयी त्यांच्याशी संवाद साधला.