शास्त्रीय संगीतामध्ये स्वरस्थाने पक्की होणे अत्यंत आवश्यक असते. ही स्वरस्थाने पक्की होण्यासाठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात प्रथम विविध अलंकारांचा (अलंकार म्हणजे सप्त स्वर विविध पद्धतींनी गाणे) सराव करावा लागतो. त्याचप्रमाणे कर्नाटक भारतीय शास्त्रीय संगीतातही प्रारंभी विविध अलंकारांचा सराव करावा लागतो. हे अलंकार ७ ताल (धु्रवताल, मठ्यताल, रूपकताल, झंपेताल, त्रिपुटताल, अटताल आणि एकताल) आणि ५ जाती (चतुश्र जाती, खंड जाती, मिश्र जाती, तीश्र जाती आणि संकीर्ण जाती) यांच्यावर आधारित आहेत. या अलंकारांच्या विविध प्रकारांचा सराव करतांना, तसेच अभंग आणि भजने म्हणतांना कु. ऐश्वर्या रायकर यांना आलेल्या अनुभूती अन् झालेले त्रास पुढे दिले आहेत. कु. ऐश्वर्या यांनी कर्नाटक शास्त्रीय संगीताचा ४ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
(भाग १)
१. ‘तारस्थायी’ (टीप १) हा संगीतातील प्रकार गातांना आलेल्या अनुभूती
१ अ. ‘तारस्थायी’चा सराव चालू करण्यापूर्वी भाववृद्धीचा प्रयोग केल्यावर ‘माझ्या भोवतालचे अनिष्ट शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे जाणवून माझे मन आनंदी आणि उत्साही झाले.
१ आ. ‘तारस्थायी’चा दुसरा आणि तिसरा प्रकार गातांना आलेल्या अनुभूती
१. ‘तारस्थायी’चा दुसरा आणि तिसरा प्रकार गाण्यापूर्वी माझे डोके फार दुखत होते आणि आज्ञाचक्रावर दाब जाणवत होता. नंतर मी ‘रामनाथी आश्रमातील भवानीमातेच्या मंदिरात तिच्या चरणांखाली बसून गात आहे’, असा भाव ठेवून गायला प्रारंभ केला. थोड्या वेळानंतर माझा ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हा नामजप चालू झाला.
२. ‘भवानीमाता माझ्यावर आईसारखे प्रेम करत आहे अन् मी छोट्या बाळाप्रमाणे आईचे चरण घट्ट धरून रडत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझी भावजागृती होत होती.
३. ‘भवानीमातेच्या अनाहतचक्रातून माझ्या आज्ञाचक्रात शक्ती जात आहे’, असे मला वाटले.
४. ‘तारस्थायी’चा तिसरा प्रकार गातांना ‘षड्ज’ (‘सा’) म्हणतांना मला ‘गुरुदेवा गुरुदेवा’, असे शब्द ऐकू येत होते. त्या वेळी माझी भावजागृती झाली.
१ इ. ‘तारस्थायी’ हा प्रकार मंद गतीने गायल्यावर चांगले वाटणे आणि तेव्हा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप चालू होऊन भावजागृती होणे : त्यानंतर मी तारस्थायी या प्रकाराचे मंद, मध्यम आणि द्रुत गतीने गायन केले. तेव्हा मला हा प्रकार मंद गतीने गायल्यावर चांगले वाटले आणि ‘त्याच स्थितीमध्ये राहून मंद गतीने गायला हवे’, असा विचार माझ्या मनात आला. हा प्रकार मंद गतीने गातांना माझा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप चालू झाला आणि माझी भावजागृती झाली.
१ ई. नंतर मी तो प्रकार मध्यम आणि द्रुत गतीने गात असतांना माझे शरीर अन् मन यांठिकाणी मला काही संवेदना जाणवत नव्हती.
२. ‘खंड जाती’ हा अलंकाराचा प्रकार गातांना आलेल्या अनुभूती
२ अ. ‘अट’नामक तालावर आधारित ‘खंड जाती’ हा प्रकार विलंबित (मंद) गतीने गातांना माझी एकाग्रता होत नव्हती.
२ आ. जेव्हा मी हा प्रकार मध्यम गतीने गायला आरंभ केला, तेव्हा माझा ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप लगेचच चालू झाला.
२ इ. गातांना तर्जनीने मांडीवर ताल धरल्यावर ‘श्री वायुदेवाय नमः ।’ हा नामजप चालू होणे, हनुमंताचे मोठे रूप दिसून ‘त्याच्या चरणांजवळ बसून गात आहोत’, असे अनुभवणे आणि त्या वेळी भावजागृती होणे : हा प्रकार गातांना मी माझ्या उजव्या हाताच्या एकेका बोटाने मांडीवर ताल धरत होते. त्या वेळी उजव्या हाताच्या तर्जनीने मांडीवर ताल धरल्यावर माझा ‘श्री वायुदेवाय नमः ।’ हा नामजप चालू झाला. त्यानंतर मला हनुमंताचे मोठे रूप दिसले आणि ‘मी त्याच्या चरणांजवळ बसून गात आहे,’ असे मला अनुभवता आले. ते दृश्य पाहून माझी भावजागृती झाली.
३. ‘सरळेवरसे’ (टीप २) हा संगीतातील प्रकार गातांना आलेल्या अनुभूती
अ. ‘सरळेवरसे’ या प्रकारातील एक रचना गातांना मला माझे शरीर पुष्कळ हलके वाटले.
आ. काही वेळाने हा प्रकार मंद गतीने गातांना ‘माझे अस्तित्व नाही’, असे जाणवून माझा ‘श्री आकाशदेवाय नमः ।’ हा नामजप चालू झाला, तसेच ‘वातावरण शांत होऊन वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
इ. ‘स, री, ग, म, प, द, नि’ हे गातांना चांगले वाटून माझी भावजागृती झाली. (कर्नाटक शास्त्रीय संगीतात ‘सा’ या स्वराला ‘स’, ‘रे’ या स्वराला ‘री’ आणि ‘ध’ या स्वराला ‘द’, असे म्हणतात.)
ई. ‘सरळेवरसे’चे ८ प्रकार गातांना माझा ‘श्री आकाशदेवाय नमः ।’ हा नामजप चालू झाला. त्या वेळी माझे मन आनंदी झाले होते.
उ. ‘सरळेवरसे’ गातांना ‘सरस्वतीदेवी वीणा वाजवत आहे’, असे मला जाणवले. गातांना माझे काही चुकले, तर ‘सरस्वतीदेवी मला शिकवत आहे’, असे मला वाटत होते.
४. ‘जंठीवरसे’ (टीप ३) हा संगीतातील प्रकार गातांना आलेल्या अनुभूती
४ अ. ‘जंठीवरसे’चा पहिला आणि दुसरा प्रकार गातांना मला माझे शरीर हलके वाटत होते.
४ आ. हा प्रकार मंद गतीने गातांना मला चंदनाचा सुगंध आला. जेव्हा मी गाणे गायचे बंद केले, तेव्हा मला सुगंध आला नाही आणि मी परत गाणे म्हणायला चालू केल्यावर मला सुगंध आला.
४ इ. काही वेळानंतर याचा दुसरा प्रकार मध्यम गतीने गातांना मला चंदनाचा सुगंध आला. सराव पूर्ण झाल्यानंतर मला हलके वाटत होते.
४ ई. ‘जंठीवरसे’चा चौथा प्रकार गातांना मूलाधारचक्रावर त्रासदायक स्पंदने जाणवणे आणि प्रार्थना करून गायल्यावर विठ्ठलाचे दर्शन होऊन भावजागृती होणे : ‘जंठीवरसे’चा चौथा प्रकार गातांना मला माझ्या मूलाधारचक्रावर त्रासदायक स्पंदने जाणवत होती. त्रासदायक स्पंदनांमुळे माझे मन गाण्यावर एकाग्र होत नव्हते. थोड्या वेळानंतर मी प्रार्थना करून आणि माझ्या भोवतालचे वाईट शक्तीचे आवरण काढून परत गायन चालू केल्यावर मला चांगले वाटले. त्यानंतर मला विठ्ठलाचे दर्शन झाले आणि माझी भावजागृती झाली.
५. अभंग आणि भजने म्हणतांना आलेल्या अनुभूती
५ अ. देवीचा अभंग म्हणतांना आलेल्या अनुभूती
१. मी देवीचा एक अभंग म्हणत असतांना मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि भवानीमाता यांचे दर्शन झाले. त्या वेळी माझ्या अंगावर रोमांच आले.
२. मी देवीचा एक अभंग भ्रमणभाषवर तानपुर्याचे संगीत लावून आणि त्यानंतर तानपुर्याचे संगीत न लावता म्हटला. तेव्हा मला तानपुर्याचे संगीत न लावता देवीचा अभंग म्हणतांना चांगले वाटले.
५ आ. चामुंडेश्वरीचे भजन म्हणतांना आलेल्या अनुभूती
१. मी चामुंडेश्वरीचे एक भजन म्हणत असतांना माता चामुंडेश्वरीचे मारक रूप माझ्या डोळ्यांसमोर आले.
२. ‘माझ्या अनाहतचक्रातून माझ्या शरिरात अधिक ऊर्जा जात आहे’, असे मला वाटले.
३. मी भजन म्हणत असतांना मला शंख, ढोल, डमरू अशा अनेक वाद्यांचे नाद ऐकू येत होते.
४. ‘देवीने राक्षसाचा वध केल्यानंतरचे आनंददायी आणि विजयी वातावरण निर्माण झाले आहे’, असे मला वाटले.
५. सराव झाल्यानंतर माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवत होत्या.
५ इ. श्रीहरीशी संबंधित २ भजने म्हणतांना आलेल्या अनुभूती
१. भजने म्हणतांना ‘मी वैकुंठात श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या चरणांजवळ बसून म्हणत आहे’, असे मला जाणवले.
२. ‘या अवस्थेतून बाहेर यायला नको आणि गाण्यात तल्लीन व्हायला पाहिजे’, असे वाटून माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
– कु. ऐश्वर्या रायकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२१)
(क्रमश: पुढच्या गुरुवारी)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/507724.html
टीप १ – ‘तारस्थायी’ : हिंदुस्थानी संगीतातील ‘अलंकार’ या प्रकारासम हा प्रकार आहे. याचे चार प्रकार असून हा प्रकार ‘मायामाळवगौळा’ या रागात गातात. या स्वररचना ‘आरोहा’त (स्वरांच्या चढत्या क्रमात) गायल्या जातात, तसेच या ‘आदिताल’ (हिंदुस्थानी संगीतातील त्रिताल) या तालामध्ये गातात.
टीप २ – सरळेवरसे : हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अलंकारसम प्रकार आहे. हा प्रकार ‘मायामाळवगौळा’ या रागावर आधारित असून याच्या ८ प्रकारच्या ‘स्वररचना’ आहेत. टीप ३ – जंठीवरसे : ‘जंठी म्हणजे दुप्पट’, म्हणजेच एक स्वर दोन वेळा गाणे, उदा. ‘सासा’, ‘रेरे’. याचे एकूण ८ प्रकार आहेत. |
|