सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी (वय ७९ वर्षे) यांनी सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी यांच्या उलगडलेल्या हृद्य आठवणी !

पू. काळेआजी माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असत. माझा आढावा देऊन झाल्यावर त्या माझ्याकडे आमच्या घरातील सर्वांची विचारपूस करत आणि सर्वांना नमस्कार सांगत.

तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना सद्गुरु आणि संत यांनी स्वप्नात येऊन आश्वस्त करून चैतन्य दिल्यामुळे त्रास न्यून होणे

त्या पहाटे माझ्या स्वप्नात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. (सौ.) अश्विनी पवार हे चौघे आले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझे डोके त्यांच्या मांडीवर घेतले आणि माझ्या गालावरून आईच्या मायेने हात फिरवला.

मुलांना लहानपणापासूनच आध्यात्मिक स्तरावर घडवणार्‍या आणि इतरांचा विचार करणार्‍या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८४ वर्षे) !

‘माझी आई पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी पूर्वीपासूनच प्रेमळ आणि सात्त्विक विचारांच्या आहेत. मला त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘गुरुतत्त्व जिवांचा उद्धार करते’, याची प्रचीती घेतलेल्या नागेशी, गोवा येथील सौ. सविता तिवारी !

‘गुरु’ हे तत्त्व आहे. गुरुतत्त्वाने प.पू. नागानिर्वाण महाराज यांच्या माध्यमातून आम्हाला आमचे खडतर प्रारब्ध भोगण्यासाठी बळ दिले. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधी प्रत्यक्ष, तर कधी तत्त्वरूपाने साहाय्य करून आम्हाला साधनेतील आनंद दिला.

ब्रह्मातील आनंदाचे स्वरूप

आत्मज्ञान झालेला, तुरीय (चौथ्या, महाकारण देहाच्या) स्थितीत असलेला, साक्षीभावात असलेला, ब्रह्मानंद अनुभवणारासुद्धा प्रारब्ध भोगणे बाकी असेपर्यंत देहात असतो आणि देहत्यागानंतर मोक्षप्राप्ती होते.

पू. भाऊकाका (पू. सदाशिव (भाऊ) परब) आले देवदला । परम पूज्यांचा आशीर्वाद मिळाला आम्हाला ।

काकांचे वय आहे आता त्र्याऐंशी । तरुणांना लाजवेल अशी प्रकृती आहे त्यांची ।।
योगासने आणि व्यायाम आहे याचे रहस्य । चला आपण सर्व होऊया या वर्गाचे सदस्य ।।

साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी नामजप करणार्‍या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (वय ८४ वर्षे) !

‘आज मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी (२.१.२०२४) या दिवशी पू. कुसुम जलतारेआजी यांचा ८४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

समाधी आणि सहजसमाधी

समर्थ म्हणतात की, ज्ञान झाल्यावर ईश्वराच्या रूपाचे आकलन होते. सर्वत्र तोच तो, तोच राम, ईश्वर दिसतो. ही केवळ कल्पना नाही. थोर संत हे अनुभवत असतात.

प्रामाणिकपणे समाजसाहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्यभाव असणारे संभाजीनगर येथील सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) !

मागील भागात ‘पू. सत्यनारायण तिवारी यांचे बालपण, शिक्षण, त्यांनी केलेले समाजकार्य आणि त्यानंतर त्यांची सनातन संस्थेच्या माध्यमातून चालू झालेली साधना’ यांविषयी पाहिले. या भागात ‘त्यांच्या मनात सनातन संस्थेविषयी निर्माण झालेली श्रद्धा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला अनन्यभाव’ यांविषयी पहाणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नियोजनबद्ध सेवा करायला शिकवल्यामुळे चुका टळून सेवेची फलनिष्पत्ती वाढल्यामुळे साधनेत प्रगती होणे

आजच्या भागात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नियोजनबद्ध सेवा करायला शिकवल्यामुळे साधनेत प्रगती करायला कसा लाभ झाला ?’, ते दिले आहे.