दीपावलीनिमित्त झालेल्या भावसत्संगात गुरुस्मरण आणि आत्मज्योतीचे स्मरण यांनी भावस्थितीत जाणारे पू. सौरभदादा !
पू. सौरभदादा संपूर्ण सत्संग एकटक भ्रमणभाषकडे लक्ष देऊन शांतपणे ऐकत होते. अधूनमधून ते ‘जय हो’, असा जयघोष करत होते; मात्र सत्संगाची सांगता जशी समीप येत होती, तसे पू. दादा शांत झाले अन् मला त्यांचे डोळे पाणावल्याचे जाणवले.