माझी लाडकी अरुणा, तिने जिंकले कृष्णमना ।

सौ. अरुणा तावडे
श्रीमती मृणालिनी भोसले

माझी लाडकी अरुणा (टीप १) ।
तिने जिंकले कृष्णमना ॥ १ ॥

गेली वैकुंठात रहायला ।
विसरली माहेरच्या खुणा ॥ २ ॥

माझी लाडकी अरुणा ।
देहभान विसरून करते सेवा ॥ ३ ॥

आनंद दिला मातेच्या मना ।
अशीच जा पुढे मोक्षाच्या द्वारा ॥ ४ ॥

टीप १ –  सौ. अरुणा तावडे

– श्रीमती मृणालिनी भोसले, मिरज (५.९.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक