‘वर्ष २००५ मध्ये मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी मिरज आश्रमात रहात होते. त्या वेळी उत्तरदायी साधकांनी मला संगणक शिकवायला कु. अरुणा कौलकर हिला (आताच्या सौ. अरुणा तावडे हिला) दायित्व दिले होते. ती मला संगणकाचा वापर कसा करायचा आणि टंकलेखन कसे करायचे इत्यादी सर्व शिकवत असे; पण मला कहीच आकलन व्हायचे नाही. ती प्रतिदिन मला अनेक प्रकारे शिकवायची; पण मला काही केल्या ते ग्रहण होत नसे. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, ‘मी हुशार असल्याने शालेय शिक्षण मला पटकन ग्रहण व्हायचे; पण इथे मला संगणकाचे काहीच कळत नाही.’ तरीही सौ. अरुणा मला न कंटाळता प्रतिदिन शिकवायची. शेवटी एक दिवस ती मला म्हणाली, ‘‘तुम्ही संगणकीय सेवा करायला शिकलात, तर मी संगणक शिकवण्यात उत्तीर्ण होईन, नाहीतर नाही.’’ त्या वेळी काय झालं ते ठाऊक नाही; पण त्या दिवसापासून मला संगणकीय सेवा करणे जमू लागले आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक लेखा (अकाऊंट) विषयक आणि कायदेविषयक संगणकीय सेवा मी चांगल्या प्रकारे करू शकत आहे. केवळ सौ. अरुणाच्या तळमळीने मला संगणकीय सेवा करता येऊ लागली.
परात्पर गुरुदेव आपल्या कृपेमुळे सौ. अरुणासारख्या तळमळ असलेल्या साधिकेचा सत्संग आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मला मिळाली. यासाठी मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे. ‘सौ. अरुणासारखी तळमळ माझ्यामध्येही येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– अधिवक्ता (सौ.) दुर्गा कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.११.२०२०)