महारुद्र यागाच्या वेळी गारवा जाणवणे आणि तेथील शिवपिंडीचे दर्शन घेतांना शिवपिंडीत निळा प्रकाश अन् शिवाची ध्यानस्थ बसलेली मूर्ती दिसणे

‘२६.११.२०१९ या दिवशी आश्रमात महारुद्र यज्ञ होता. दुपारी ४.३० वाजता पूजा आणि महारुद्र याग झाला. स्फटिकाच्या शिवपिंडीची पांढर्‍या फुलांनी पूजा केली होती. त्याचे दर्शन घेतांना मला शिवपिंडीत निळा प्रकाश दिसला आणि शिवाची ध्यानस्थ बसलेली मूर्ती दिसली. तेथे महारुद्र याग करूनही गारवा जाणवत होता. मला अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या शिवपिंडी दिसत होत्या आणि सर्वत्र शिवाचे दर्शन होत होते.’

– सौ. वैशाली मुदगल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.११.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक