साधकांनो, ‘आपत्कालामध्ये घडणारा प्रसंग आणि परिस्थिती ही शिकण्यासाठी अन् स्वत:ला पालटण्यासाठी संधी असून ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाच्या दिशेने नेणारी आहे’, असा सकारात्मक विचार करा !

सौ. कोमल जोशी

सर्वत्रच्या साधकांनो, ‘आपत्कालामध्ये घडणारे प्रसंग आणि परिस्थिती ही मला शिकण्यासाठी, पालटण्यासाठी संधी असून ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाच्या दिशेने नेणारी आहे’, असा सकारात्मक विचार करा. ‘प्रत्येक प्रसंगात आणि परिस्थितीत माझ्याकडून देवाला काय अपेक्षित आहे ? त्याला काय शिकवायचे आहे ? मी कुठे आहे ?’, असा अंतर्मुख होऊन विचार करा. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा, तुमच्या अंतर्मनाची साधना होऊन तुमच्यात साधकत्व असेल, तरच तुम्ही निर्विचार अवस्थेकडे जाऊन मोक्षाच्या दिशेने वाटचाल कराल. – सौ. कोमल जोशी (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (१९.२.२०१०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.