ईश्‍वराला जाणून घेतल्‍याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्‍य !

आपण सुखासमाधानात रहावे; परंतु त्‍याच वेळी आपण कृष्‍णभावात किंवा ईश्‍वरभावात असावे, त्‍यामुळे आपण सुखी होऊ. ईश्‍वराला जाणून घेतल्‍याविना आणि ईश्‍वराशी भावातीत झाल्‍याविना खरी शांती अन् सुख मिळण्‍याची शक्‍यता नाही.

प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध असणे, हे केवळ हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदु धर्मात १४ विद्या आणि ६४ कला या मार्गांनी साधना शिकवता येते.

पंचतत्त्वांशी संबंधित सिद्धांत संतांच्‍या बाबतीत लागू न पडणे

‘शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्र असतात’, हा सिद्धांत सर्वसाधारण वस्‍तू आणि व्‍यक्‍ती यांच्‍या संदर्भात लागू पडतो, संतांच्‍या बाबतीत नाही ! याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

पापांवर प्रायश्‍चित्ते

पापांच्‍या परिणामस्‍वरूप पुढे खूप पीडा भोगाव्‍या लागतात. वेगवेगळ्‍या पापांची अशी फळे नष्‍ट करण्‍यासाठी वेगवेगळी प्रायश्‍चित्ते सांगितलेली आहेत. ही प्रायश्‍चित्ते खूपच कठोर आहेत.

धार्मिक कृतींचे ज्ञान आणि आत्‍मज्ञानातील अंतर

धार्मिक कृतींचे ज्ञान झाले तरी त्‍यांचे कार्य शेष असते, तर आत्‍मज्ञानाचा एकदा बोध झाला की अज्ञान मिटून ज्ञानाचे कार्य संपते. अज्ञान नाहीसे होणे, हे आत्‍मज्ञानाचे फळ आहे. पुन्‍हा पुन्‍हा  काही करावे लागत नाही.

मोक्षप्राप्ती एकट्याने आणि एकट्यालाच होते !

आरंभिक साधनेनंतर पुढे प्रगतीसाठी व्यक्तिगत प्रयत्न अत्यावश्यक असतात. मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न अगदी एकट्यानेच करावे लागतात आणि मोक्षप्राप्ती केवळ त्या एकट्यालाच होते.

भक्‍ती असो वा ज्ञान, ईश्‍वर असे अधिष्‍ठान

ईश्‍वरावरील श्रद्धा आणि विश्‍वासामुळे भक्‍त आपल्‍या आध्‍यात्मिक प्रगतीचा भार ईश्‍वरावर टाकतो. ज्ञानी मनुष्‍य आपला आत्‍मा हा ज्ञानमय चैतन्‍यरूपी ईश्‍वराचाच अंश आहे हे जाणून आत्‍मबळाने आध्‍यात्मिक प्रगती करतो. दोघेही ईश्‍वराच्‍या आधारावरच प्रगती करतात.

साधनेचे मनुष्‍याच्‍या जीवनात आणि त्‍याच्‍या मृत्‍यूनंतरही असलेले अनन्‍यसाधारण महत्त्व !

एका साधकाच्‍या अंत्‍यसंस्‍कार विधीच्‍या वेळी त्‍याच्‍या नातेवाइकांनी सांगितले, ‘‘आम्‍ही समाजातील एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या अंत्‍यविधीला गेल्‍यावर तेथे दुर्गंध येत असतो. परंतु साधकाच्‍या अंत्‍यविधीच्‍या वेळी आम्‍हाला असे काहीही जाणवले नाही.

आध्‍यात्मिक विकास हाच समर्पक विकास !

तुम्‍ही स्‍वतःचा विकास करण्‍याकरता प्रयत्न करत आहात; पण तुम्‍ही आध्‍यात्मिकरित्‍या विकसित व्‍हा; कारण आध्‍यात्मिक विकास, हाच समर्पक विकास आहे.

साधनेत स्‍थुलातील चुका सांगण्‍याचे महत्त्व !

साधनेमध्‍ये मनाच्‍या स्‍तरावर होणारी अयोग्‍य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्‍या अभावामुळे साधकाला स्‍वतःच्‍या चुका कळत नाहीत आणि त्‍या मनाच्‍या स्‍तरावरील चुका असल्‍यामुळे इतरांच्‍या लक्षात येत नाहीत.