‘गुरुदेवा, स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जपण्‍याचा माझा मिथ्‍या अहं नष्‍ट करा’, अशी तुमच्‍या चरणी प्रार्थना !

‘गुरुदेवा, या जिवावर सर्वस्‍वी तुमचा अधिकार असतांनाही माझे मन मात्र तसा विचार करायला न्‍यून पडून स्‍वतःचे स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जोपासते. माझे मन कधी कधी ऐकण्‍याची भूमिका घेते, तर कधी बंडखोरीही करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले इतर संतांप्रमाणे समाजात इतरांना न भेटण्याचे कारण !

मी भेटल्यानंतर स्थळ-काळानुसार फारच मर्यादित लोकांना भेटीचा खरा लाभ होतो. इतरांना न भेटता मी अधिकाधिक वेळ ग्रंथलिखाणाची सेवा करत असतो.

सतत इतरांमधील दोषच पाहून बहिर्मुख होऊ नका !

‘अनेक वर्षांपासून साधना करत असलेले अनेक साधक बर्‍याचदा इतरांमधील दोषच अधिक पहात असतात. त्यामुळे अशा साधकांना इतरांविषयी प्रतिक्रिया येतात किंवा ते त्यांच्याविषयी टीकात्मक बोलतात अथवा विकल्प पसरवतात.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे भक्तांना मार्गदर्शन

संन्यासी भगवंताच्या स्मरणात जीवन व्यतीत करण्यासाठी घरादाराचा त्याग करून ईश्वराच्या स्मरणात रहातो.

साधकांनो, ‘आध्यात्मिक उन्नती कधी होईल ?’, याची काळजी न करता परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तळमळीने प्रयत्न करत रहा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा !

बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

‘बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्हाल, तेव्हा बालक्रीडा सोडून द्या अन् वृद्धपणी तारुण्यातील खेळ, चेष्टा आणि विनोद सोडून द्या.

‘रामनाथी आश्रम ‘वैकुंठ आहे’, असा भाव असल्याने ‘मुलाच्या विवाहानंतर देवदर्शनाला बाहेरगावी जाण्याची आवश्यकता नाही’, असा विचार करणार्‍या श्रीमती संध्या बधाले !

सर्व साधकांनी श्रीमती बधाले यांच्याप्रमाणे भाव ठेवल्यास त्यांनाही आश्रमाचा आणि येथील चैतन्याचा साधनेसाठी लाभ करून घेता येईल.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनमोल विचारधन

‘दुःख करणे किंवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे, तो माणूस प्रत्यक्ष दुःख भोगत असतांनाही आनंदात राहू शकेल.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची अमृतवाणी

‘भक्त प्रारब्ध टाळू शकतो; पण तो देहाला विसरला असल्याकारणाने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हींची त्याला काळजी नसते; म्हणून तो भोग टाळत नाही.’

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

लागोनियां पायां विनवितो तुम्हांला ।
करे टाळी बोला मुखे नाम ॥