जालना – मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील २० जानेवारी या दिवशी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे यांनी मातोरी गावात मुक्काम केला. त्यानंतर जरांगे यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. पायी दिंडीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, २६ जानेवारीच्या आधी सरकारने तोडगा काढावा. यावर तोडगा कसा काढता येईल ? हे पहावे. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबई येथे येणार आहे. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना मराठ्यांची शक्ती पहायची असेल. मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहे. २ दिवस वाट पहाणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नये. सत्ता येत असते जात असते; मात्र दादागिरीची भाषा करू नका, अशी चेतावणी त्यांनी सरकारला दिली.