मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण चालू !

पुणे येथे सर्व्हर ठप्प झाल्याने सर्वेक्षणाच्या कामात अडथळा

पुणे – मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून २३ जानेवारी या दिवसापासून सर्वेक्षण चालू झाले; परंतु दुसर्‍याच दिवशी सर्व्हर ठप्प झाल्याने सर्वेक्षणाच्या कामाचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाचे मागासलेपण पडताळण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये १२ लाख कुटुंबांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याकरता पुणे महापालिकेने २ सहस्र  कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यांना तसे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.