दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुवेतहून भारतात आलेल्या ३ आरोपींना जामीन !; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद !…

कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.

२० फेब्रुवारीनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

जरांगे म्हणाले , १००-२०० लोकांसाठी मराठ्यांचे वाटोळे होईल. ६ कोटी मराठ्यांना ‘ओबीसी’तून आरक्षण देण्याची मागणी आहे. सरकारने २० फेब्रुवारी या दिवशी आरक्षण दिले, तरी मराठ्यांना ‘ओबीसी’तूनच आरक्षण देण्यासाठी आमचे आंदोलन चालू राहील.

मराठ्यांना १० ते १२ टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता !

मराठा समाजाला आरक्षण देतांना सध्याच्या ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्यास न्यायालयात जाण्याची चेतावणी ओबीसी नेत्यांनी दिली आहे.

मराठा आंदोलनावेळी प्रविष्ट ७९ गुन्ह्यांपैकी ३६ गुन्हे मागे घेणार !

मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या वेळी जिल्ह्यामध्ये अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून ७९ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.

केंद्र आणि राज्य सरकार यांची कामे ‘शिवदूत’ बनून जनतेपर्यंत पोचवा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला महासत्ता बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी आपल्याला लोकसभेसाठी ४०० हून अधिक जागा जिंकून आणण्याचे ध्येय दिले असून महाराष्ट्रात आपल्याला ४५ हून अधिक जागा निवडून आणायच्या आहेत.

‘सगेसोयरे’ची अधिसूचना लागू झाल्याविना आंदोलन मागे घेणार नाही ! – मनोज जरांगे पाटील

‘मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे संबंधीच्या अधिसूचनेची कार्यवाही झाल्याविना आंदोलन मागे घेणार नाही’, असा ठाम निर्धार मराठा समाजाचे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केला.

हिंगोली येथे मराठा आंदोलनाच्या वेळी तरुणांनी बस पेटवली !

हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १६ फेब्रुवारी या दिवशी ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटी येथे अज्ञात तरुणांनी बस पेटवून दिल्याने वसमत आगाराची अनुमाने ४० लाख रुपयांची हानी झाली आहे.

मराठा आरक्षणाला आमचा कायम पाठिंबा ! – नीतेश राणे, आमदार, भाजप

‘मराठा आरक्षणाला आमचा कायम पाठिंबा आहे. आम्ही त्यांना कायम पाठिंबा दिला आहे, तसेच जरांगे पाटील यांना ‘तुम्ही राजकीय टीका करू नका’, हेच आम्ही सांगत आहोत’, असे भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी म्हटले आहे.

सरकारने मराठ्यांचे कुणबीकरण थांबवावे ! – छगन भुजबळ, मंत्री

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे; मात्र ‘ओबीसी’तून आरक्षण देण्याला विरोध आहे; कारण अलीकडे अनेक मराठा समाजाच्या लोकांना खोट्या नोंदी घेऊन कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया चालू आहे.

मराठा सर्वेक्षण अहवाल राज्यशासनाकडे सादर !

‘राज्य सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर सूत्रांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल