२० फेब्रुवारीच्या अधिवेशनात अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई – मराठा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. ‘हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल’, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
‘राज्य सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर सूत्रांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल आणि इतर मागण्यांवर चर्चा होईल. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही’, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.