खेड (पुणे) तालुक्यातील शाळेच्या आवारात मद्याची पार्टी करणार्‍यांना अटक  

दळणवळण बंदीच्या काळात सर्व दुकाने बंद असतांना पार्टी करण्यासाठी दारू कुठून मिळाली, याचा शोध घेऊन संबंधितांना पोलिसांनी कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे.

भुईंज (सातारा) येथे राजकीय हितसंबंधातून सार्वजनिक मालमत्तेचा अपहार

भुईंज ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकासह १८ सदस्यांनी ग्रामपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता त्रयस्तांना हस्तांतरीत केली.

कोलगाव येथील आय.टी.आय. कारागृहातील आरोपी पसार

कारागृहातील आरोपी प्रमोद परब पहाटे पसार झाल्याचे उघड झाले. 

कोरोनाच्या काळात अंबरनाथ-बदलापूर विभागातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे रुग्णांना साहाय्य !

कठीण प्रसंगात रुग्णसेवा करून त्यांना आधार देणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श अन्य समाजसेवी संघटनांनीही घ्यावा !

परभणी येथे शिक्षकाच्या कुटुंबियांची अपर्कीती करणार्‍या तरुणावर अदखलपात्र गुन्हा नोंद !

सामाजिक माध्यमातील गटावर शिक्षकाच्या कुटुंबियांची अपर्कीती करणारा अविनाश सांगळे या तरुणावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भुयारी गटार योजनेमुळे सातारा शहरातील मंगळवार पेठेतील रस्त्यांची चाळण

सातारा नगरपालिकेच्या वतीने ऐव पावसाळ्याच्या तोंडवर भुयारी गटार योजना शहरातील मंगळवार पेठेत राबवण्यात येत आहे. यासाठी मंगळवार पेठेतील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत.

दळणवळण बंदीतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथे हॉटेल चालकाला दंड

‘हॉटेल मिलन’च्या मालकाने हॉटेलमध्येच ४० ते ५० नागरिकांना प्रवेश देऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. ही माहिती मिळाल्यावर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी ही कारवाई केली.

‘म्युकरमायकोसिस’वर उपचार करण्यासाठी स्वतंत्र केअर सेंटर उभारा !

पवार यांनी पुढे म्हटले आहे की, बारामती तालुक्यामध्ये आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यात याव्यात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. लहान मुलांसाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र खाटा राखीव ठेवाव्यात.

शहरातील दुकाने उघडण्यास अनुमती द्या ! – पुणे व्यापारी महासंघाची मागणी

सणासुदीच्या काळात व्यापार बंद असल्याने व्यापारी आणि कर्मचारी वर्गासमोर संकट उभे राहिले आहे. दळणवळण बंदीचा व्यापार क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याने व्यापार्‍यांची हानी झाल्याचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले.

‘उजनी धरणा’च्या पाण्यावरून पंढरपूर येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आंदोलन

सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरसाठी संमत केलेले ५ टी.एम्.सी. पाणी त्वरित रहित करून तसा शासन आदेश काढावा, या मागणीसाठी २४ मे पासून पंढरपूर येथे या आंदोलनाचा प्रारंभ झाला.