सांगली येथील शासकीय रुग्णालयात ‘लिक्विड ऑक्सिजन प्लँट’ चालू ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

शासकीय रुग्णालयासाठी प्रतिदिन अर्धा ते १ मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता असते. एकदा हा टँक पूर्ण क्षमतेने भरल्यावर हा ऑक्सिजन अंदाजे १७ ते १८ दिवस पुरेल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील ‘मॉर्निंग वॉक’ करणारे ३७ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

२२ मे या दिवशी ‘मॉर्निंग वॉक’साठी रस्त्यांवर फिरणार्‍या ७० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या वेळी ७० पैकी ३७ नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

कोरोनासह ‘म्युकरमायकोसिस’शी लढण्यासाठी सातारा जिल्हा आरोग्ययंत्रणा सज्ज

सातारा जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’मुळे (काळी बुरशी) आतापर्यंत ३ जणांचे मृत्यू झाले असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात २८ रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आधुनिक वैद्य सुभाष चव्हाण यांनी दिली.

संभाजीनगर जिल्ह्यातील ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ आपत्तीला तोंड देण्यास असक्षम

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ भंगार आणि नादुरुस्त साधनसामग्रीवर अवलंबून आहे. पुरेसे मनुष्यबळ तर नाहीच; पण जिल्ह्यात कुठेही आगीची घटना घडल्यास विभागाला महापालिकेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून रहावे लागते.

निधन वार्ता

सनातन संस्थेच्या साधिका सौ. मधुरा लोकरे यांच्या सासूबाई आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सुहास लोकरे यांच्या मातोश्री श्रीमती कांचन लक्ष्मण लोकरे (वय ७१ वर्षे) यांचे कर्करोगामुळे त्यांच्या रहात्या घरी निधन झाले.

विनापरवाना कोरोना चाचणी करणार्‍या लॅबवर कारवाई

सासवड शहरातील साळीआळी भागात ही ‘पॅथॉलॉजी लॅब’ आहे. येथे ‘रॅपिड अँटीजेन’ चाचणी केली जात होती; मात्र त्यासाठी आवश्यक असणारी शासनाकडील आरोग्यसेवेच्या जिल्हा शल्य चिकित्सकांची अनुमती नसल्याचे आढळले.

विरार येथे रुग्णाच्या नातेवाइकांकडून आधुनिक वैद्यांवर आक्रमण, गुन्हा प्रविष्ट

आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करतांना महिला रुग्णाच्या नाकात नळी तुटल्याने नाकातून रक्तस्त्राव झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.

संभाजीनगर येथे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाकडून २६ दुकाने आणि आस्थापन यांच्यावर कारवाई !

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कामगार उपायुक्त, महानगरपालिका आणि महसूल अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत ‘विशेष भरारी पथके’ सिद्ध करुन कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.

रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन अन् काळजी घेतल्यास ‘म्युकरमायकोसिस’ला दूर ठेवता येते ! – आधुनिक वैद्य प्रशांत निखाडे

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाने विशेष काळजी घेतल्यास या आजाराला स्वत:पासून दूर ठेवणे शक्य आहे, अशी माहिती विदर्भ ई.एन्.टी.सी. संघटनेचे आणि ‘टास्क फोर्स’चे अध्यक्ष आधुनिक वैद्य प्रशांत निखाडे यांनी दिली.

कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के !

पश्‍चिम महाराष्ट्रात २३ मे या दिवशी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ‘रिश्टर स्केल’वर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.