परभणी – सामाजिक माध्यमातील गटावर शिक्षकाच्या कुटुंबियांची अपर्कीती करणारा अविनाश सांगळे या तरुणावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागोराव पांचाळ (वय ४६ वर्षे) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पांचाळ हे शिक्षक आणि विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्षही आहेत. अविनाश हा विनाकारण पांचाळ यांच्याविषयी अपशब्द उच्चारत असे. नागोराव यांनी अविनाशच्या वडिलांना मुलाच्या कृत्याविषयी माहिती दिली. त्यानंतर अविनाश याने नागोराव यांना दूरभाष करून धमकी दिली, तसेच सामाजिक माध्यमातील गटावर नागोराव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत अपर्कीतीकारक माहिती प्रसारित केली.