उत्तरप्रदेशमधील पंचायत निवडणुकीत समाजवादी पक्षाची सरशी
विशेष म्हणजे अयोध्या, काशी आणि मथुरा या जिल्ह्यांतही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.
विशेष म्हणजे अयोध्या, काशी आणि मथुरा या जिल्ह्यांतही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.
कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला विसंगत पत्र सिद्ध करून ते प्रसिद्ध केले आहे. सध्या ते सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून कोरेगावातील विविध प्रसिद्धीगटांमध्ये फिरत आहेत.
ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दत्तात्रय सावंत यांचा सत्कार केला. ‘कोरोनाचे संकट संपेपर्यंत जनसेवेचे हे कार्य चालू ठेवणार आहे’, असे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.
सावंतवाडी ते रेडी मार्गावरील मळगाव येथील बॉक्सवेलजवळ (मुख्य मार्गाच्या खालून जाण्यासाठी केलेला मार्ग) वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘बहिर्वक्र आरसे’ लावण्यात आले आहेत. यातील २ आरशांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली.
कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ५ मे या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून १० दिवसांची दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मिरज येथील सनातनच्या साधिका कु. सुनंदा कृष्णराव आचार्य (वय ६७ वर्षे) यांचे १ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
दैनिक सनातन प्रभातचे गेल्या १२ वर्षे अखंडपणे वितरणाची सेवा करणारे विश्वास आबासाहेब हांडे-देशमुख (वय ७४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
कोरोनाची सौम्य लक्षणे झाल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्ण गृहविलगीकरणात रहाण्याची विनंती करतात. त्यांना तशी अनुमती दिली जाते; मात्र नंतर रुग्ण बाहेर फिरतात आणि संसर्ग वाढतो. त्यामुळे अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे दायित्व प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेल्पलाईनवरून खाटा मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जात असले, तरी त्याच वेळी सर्व खासगी रुग्णालये आणि सरकारी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची थेट भरती होते. गंभीर रुग्णाला अत्यावश्यक व्हेंटिलेटर सज्ज खाटा थेट रुग्णालयांकडून भरल्या जातात. त्यामुळे या जागा हेल्पलाईन वर उपलब्ध होत नाहीत असे दिसले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू क्रांतीवीर गणेश दामोदर सावरकर यांची २ मे १९२१ या दिवशी अंदमानच्या सेल्युलर कारागृहातून मुक्तता झाली. या ऐतिहासिक घटनेला २ मे २०२१ या दिवशी एक शतक पूर्ण झाले.