निधन वार्ता

पुणे – येथील गावठाण केंद्रातील दैनिक सनातन प्रभातचे गेल्या १२ वर्षे अखंडपणे वितरणाची सेवा करणारे आणि हितचिंतक विश्‍वास आबासाहेब हांडे-देशमुख (वय ७४ वर्षे) यांचे २ मे २०२१ या दिवशी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, ३ मुले, ३ सुना, ५ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार हांडे-देशमुख यांच्या दुःखात सहभागी आहे.