कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांचे बालीश विधान

बेंगळुरू (कर्नाटक) – शहरातील ‘फ्रीडम पार्क’ येथे ‘नीट’ प्रश्नपत्रिकाविरोधी आंदोलन करणार्या आंदोलकांना माझ्या गृह खात्याकडून पूर्ण सहकार्य केले जात आहे. कोणताही अत्याचार न करता अत्यंत शिस्तीत आंदोलन चालू आहे. पंतप्रधान मोदी यांना बेंगळुरूतील आंदोलनाचे रील्स (छोटे व्हिडिओ) पाठवून द्या. गृहखाते अत्याचारांविना सुरळीत कसे चालवावे ?’, हे अमित शहा यांनी कर्नाटकाकडून शिकावे, असे बालीश वक्तव्य गृहमंत्री प्रियंक खर्गे यांनी केले.
आंदोलकांनी उमर खालिद याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यावरून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना खर्गे म्हणाले की, ‘तो देशद्रोही आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे का ? केंद्र सरकारला अद्याप आरोपपत्रही प्रविष्ट करता आलेले नाही. (एखाद्या मुसलमान आरोपीचा विषय आला की, काँग्रेसी नेत्यांना लोकशाही, न्यायव्यवस्था आदींची आठवण होते. दुसरीकडे हिंदु राष्ट्राची मागणी करणार्या हिंदुत्वनिष्ठांना मात्र हेच काँग्रेसी देशद्रोही म्हणून आणि त्यांची निंदानालस्ती करून मोकळे होतात ! – संपादक)
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार
CJP Party : कॉकरोच जनता पक्षाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये नाच-गाण्यासह मेजवानी !
E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा