Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !

 जर्मनीतील ‘एल्जीबीटीक्यू’ समुदायावरील आक्रमणाचे प्रकरण

(‘एलजीबीटीक्यू ’ समुदाय म्हणजे समलिंगी, तसेच लिंगपरिवर्तन केलेले लोक)

अब्दुल बल्लाऊट

बर्लिन (जर्मनी) – येथे २५ जुलैला बर्लिनमधील टियरगार्टन परिसरात ‘एलजीबीटीक्यू ’ समुदायाच्या झालेल्या ‘क्रिस्टोफर स्ट्रीट डे प्राईड’ कार्यक्रमात चारचाकी गाडी घुसवणारा जिहादी अब्दुल बल्लाऊट याला जर्मन पोलिसांनी २४ घंट्यांच्या आत ठार मारले. अब्दुलने २५ जुलैला केलेल्या आक्रमणात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर २९ जण घायाळ झाले आहेत.

स्पँडाऊ भागात पोलिसांनी त्याला घेरल्यानंतर तो शस्त्र घेऊन त्यांच्या दिशेने धावला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. जर्मनीचे चांसलर (देशाचे प्रमुख) फ्रेडरिक मर्ज यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २४ घंट्यांच्या आत पोलिसांनी ही कारवाई केली. बल्लाऊट हा जर्मनीचा नागरिक असून त्याचे लेबनॉनशी संबंध होते. त्याने यापूर्वी इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर या संघटनेचा प्रचार आणि हिंसक कृत्ये करण्यासाठी सिद्धता केल्याचे आरोपही झाले होते.