‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय दल

नवी देहली – प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ६ सदस्यीय उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना केली. ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली हे दल कार्य करेल, अशी घोषणा मोदी यांनी २६ जुलैला केली.
समितीत कोण असणार ?
परीक्षा पद्धतीत, विशेषतः तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुधारणा करण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ञांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. समितीतील सदस्य पुढीलप्रमाणे आहेत :
१. तंत्रज्ञान तज्ञ नंदन निलेकणी
२. ‘इस्त्रो’चे माजी अध्यक्ष एस्. सोमनाथ
३. गुप्तचर विभागाचे माजी संचालक तपन डेका
४. ‘आयआयटी चेन्नई’चे अध्यक्ष व्ही. कामाकोटी
५. माजी शिक्षण सचिव अनिता करवाल
६. लॉजिस्टिक्स (वाहतूक, साठवणूक आदींचे व्यवस्थापन) तज्ञ अमृत लाल मीना
ही समिती आगामी परीक्षा सुरक्षित करण्यासाठी तातडीच्या उपायांविषयी शिफारसी सादर करणार आहे. भारताची राष्ट्रीय परीक्षा आणि चाचणी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित अन् ‘प्रश्नपत्रिका फुटी’ मुक्त करण्यासाठी त्यात परिवर्तन घडवून आणणे, हे या समितीसमोरीप्रशासनल मुख्य कार्य असेल.
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार
CJP Party : कॉकरोच जनता पक्षाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये नाच-गाण्यासह मेजवानी !
E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना