Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या

टोरंटो (कॅनडा) – येथे नवनीत कौर (वय २६ वर्षे) नावाच्या भारतीय वंशाच्या तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येच्या प्रकरणी टोरंटो पोलिसांनी बॅम्प्टनमधून एका आरोपीला अटक केली आहे. शरणजीत सिंह असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या तरुणीला टोरंटोमधील हंबरवुड बुलेवर्डजवळ गोळ्या घालण्यात आल्या.  टोरंटो पोलिसांना तरुणी घायाळ अवस्थेत आढळली. पोलिसांनी तिला तातडीचे वैद्यकीय साहाय्य पुरवले; मात्र घटनास्थळीच तिला मृत घोषित करण्यात आले. आरोपी शरणजीत सिंहने तरुणीची हत्या का केली ?, याविषयी अद्याप समजू शकले नाही. पोलीस याविषयी  सखोल अन्वेषण करत आहेत.