कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त

वॉशिंग्टन (अमेरिका) – कॅनडा आणि अमेरिका यांच्या सुरक्षायंत्रणांनी एका  संयुक्त कारवाईत अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय टोळीला पकडले. या टोळीकडून अनुमाने १ सहस्र ७०० किलोग्राम अवैध अमली पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १३९ दशलक्ष डॉलर्सपेक्षा(अनुमाने १ सहस्र १६० कोटी रुपयांपेक्षा) अधिक असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात एकूण २१ जणांना अटक करण्यात आली असून त्यात पंजाबी वंशाच्या १३ आरोपींचा समावेश आहे. (या १३ आरोपींमध्ये खलिस्तानी नसतील कशावरून? खलिस्तानी हा पैसा आतंकवादी कारवाया करण्यासाठी वापरत नसतील कशावरून ? भारताने कॅनडा आणि अमेरिका यांच्या सुरक्षायंत्रणांना या दृष्टीनेही अन्वेषण करण्यास भाग पाडले पाहिजे ! – संपादक)

अन्वेषण यंत्रणांच्या मते, ही टोळी एका कायदेशीर वाहतूक आणि पुरवठा  प्रणालीच्या नावाखाली कॅनडा आणि अमेरिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी करत होती.