‘ॲपेक्स कोव्हिड हॉस्पिटल’मधील आधुनिक वैद्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – दीपक माने, संघटन सरचिटणीस, भाजप
गेली दीड वर्षे ‘ॲपेक्स कोव्हिड हॉस्पिटल’मध्ये अनेक रुग्णांवर चुकीचे उपचार केल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील आधुनिक वैद्यांवर यापूर्वी फौजदारी गुन्हे नोंद असून सांगली महापालिकेनेही रुग्ण आणि प्रशासन यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.