दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी करारावर केली स्वाक्षरी

पॅरिस (फ्रान्स) – अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी अंतरिम करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबतच्या बैठकीत पॅरिसमधील व्हर्साय पॅलेसमध्ये स्वाक्षरी केली. यानंतर इराणचे अध्यक्ष पेजेश्कियान यांनीही इराणमधून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करारावर स्वाक्षरी केली. भारतीय वेळेनुसार १८ जूनच्या पहाटे ५ वाजता दोन्ही नेत्यांच्या स्वाक्षरीनंतर लगेच हा करार लागू झाला. या करारानुसार इराणमधील युद्ध समाप्त होईल आणि लेबनॉनमधील संघर्षही संपवण्याविषयी बोलले गेले आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनी (२ जलाशयांना जोडणारा जलमार्ग) पुन्हा खुली करणे आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी समाप्त करणे यांविषयी बोलले गेले आहे.
कराराचे उल्लंघन केले, तर इराणवर पुन्हा बाँबफेक करू ! – ट्रम्प
ट्रम्प यांच्या मते, ‘युद्ध संपवणे, हॉर्मुझला उघडणे आणि इराणला अणूबाँबपासून रोखणे हे आमचे लक्ष्य होते, जे पूर्ण झाले आहे. जर इराणने अमेरिकेसमवेत झालेल्या कराराचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर पुन्हा बाँबफेक केली जाईल. आम्ही इराणला अणूबाँब मिळवू देणार नाही.’
इराणला अमेरिकेचा एक डॉलरही मिळणार नाही ! – उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स म्हणाले की, इराणला ३०० अब्ज डॉलरचे (२८ लाख कोटी रुपयांचे) पॅकेज देणार्या बातम्या दिशाभूल करणार्या आहेत. जर इराणने अटी मान्य केल्या, तर इतर देश गुंतवणूक करू शकतात; परंतु अमेरिका एक डॉलरही इराणला देणार नाही.
दोन्ही पक्षांनी कराराचे पूर्णपणे पालन करावे ! – चीन
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की, सर्व पक्षांनी युद्धबंदीचा आदर केला पाहिजे. चीनने इराण आणि लेबनॉन यांना मानवतावादी साहाय्य देण्याचीही घोषणा केली.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता