‘स्वाभिमानी कोविड – १९ प्राथमिक उपचार केंद्रा’त ‘शिवलीला सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने प्रबोधन गीते सादर

‘स्वाभिमानी कोविड – १९ प्राथमिक उपचार केंद्रा’कडून प्रमाणपत्र स्वीकारतांना सुरेश गरड (डावीकडून तिसरे), तसेच अन्य

मिरज, २ जून – समडोळी येथील प्राचीन तीर्थक्षेत्र ‘आदिनाथ जैन मंदिरा’च्या परिसरातील कार्यस्थळावर ‘स्वाभिमानी कोविड – १९ प्राथमिक उपचार केंद्र (आदिगिरी)’ चालू करण्यात आले आहे. या केंद्राच्या कक्षेत ‘शिवसमर्थ सोंगी भजनी मंडळ’ आणि ‘शिवलीला सांस्कृतिक कला मंच’चे प्रमुख सुरेश गरड यांनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून रुग्णांसाठी प्रबोधन गीते सादर केली. या प्रसंगी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रारंभी मुख्य प्रवर्तक संजय बेले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.

पत्रकार बाळासाहेब खोत यांनी अभिनयारूप प्रसंगाद्वारे आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. या वेळी केंद्राचे अध्यक्ष विद्याधर बेले, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव दीपक मगदूम, कोषाध्यक्ष सुरेश पाटील, वैद्य चंद्रकांत पाटील, डॉ. राहुल रूगे, डॉ. सौ. दीपाली रूगे यांसह अन्य उपस्थित होते.