इस्लामाबाद (पाकिस्तान) – अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी एक ऐतिहासिक शांतता करार झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत याचे श्रेय लाटले आहे.
शाहबाज शरीफ त्यांनी म्हटले की, मी आनंदाने आणि समाधानाने हे घोषित करत आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक ‘इस्लामाबाद सामंजस्य करारा’वर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षर्या करण्यात आल्या आहेत. मध्यस्थ म्हणून मीही त्यास मान्यता दिली आहे. इस्लामाबाद सामंजस्य करार तात्काळ लागू होईल. कराराच्या पहिल्या टप्प्यात इराण हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडी करेल आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने तातडीने नौदल नाकाबंदी उठवतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करतो. राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याची त्यांची ठाम बांधिलकी आणि शांततापूर्ण समाधान यांना दिलेले प्राधान्य, यांमुळे हा संघर्ष संपुष्टात आला आहे, जो या प्रदेशासाठी आणि जगासाठीही अत्यंत विनाशकारी ठरू शकला असता.

Pakistan Sikh Murder : पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये घुसून शीख सेवादार दांपत्याची हत्या
France Backs India : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे ! – फ्रान्स
Trump Vs Lula : ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करू नका !
US-Iran Peace Deal : अमेरिका-इराण यांच्यात अंततः युद्धबंदी करार !
ISI Terrorist Arrested : आय.एस्.आय.शी संबंधित आतंकवादी गटातील आणखी ५ जणांना अटक
… तर जात्यात जाण्याची वेळ कधीही येऊ शकते !