
बागपत (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरात चोरी होणे, ही काही नवीन गोष्ट नाही. तुम्ही हे सूत्र आता मांडले आहे; पण तेथे फार आधीपासून चोरी होत आहे. मुलाचे पाय पाळण्यातच दिसतात. मंदिर निर्मितीच्या वेळी तज्ञांना बोलावणे आवश्यक होते. मंदिर उभारणीच्या कामासंदर्भात ४ शंकराचार्य आणि १३ आखाड्यांचे प्रमुख सिद्ध होते; मात्र त्यांना बाजूला सारून स्वतःच्या विशेष लोकांना न्यासामध्ये घेण्यात आले. जेव्हा तुम्ही तुमच्या विशेष लोकांना ठेवता, याचा अर्थ ते स्वतःचे काम करू शकतील; म्हणूनच त्यांना ठेवले गेले. तिथे चोरी होणार, हे त्याच वेळी स्पष्ट झाले होते, अशी प्रतिक्रिया ज्योतिष पीठाचे शंकराचार्थ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे व्यक्त केली.
आगामी निवडणुकीत गोमातेच्या रक्षणासाठीच मतदान करा !
गोमातेच्या रक्षणाविषयी शंकराचार्य म्हणाले, ‘‘गोमाता हा केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा पाया आहे. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवावा, यासाठी आम्ही संपूर्ण उत्तरप्रदेश राज्यात जनजागरण यात्रा काढत आहोत. आतापर्यंत अनुमाने २०० विधानसभा मतदारसंघांतील लोकांशी संवाद साधला आहे. आगामी निवडणुकीत गोमातेच्या रक्षणासाठीच मतदान करा.’’
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक