चेतनेच्या विविध टप्प्यांनुसार जिवात निर्माण हाेणार्या प्रेरणा आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग यांचे विवेचन !
भारतीय तत्त्वज्ञानानुसार जिवाच्या सूक्ष्मदेहात अन्नमयादी ५ कोष असतात. या ५ कोषांमध्ये चेतना कार्यरत असते. प्रत्येक कोषातील चेतनेनुसार व्यक्तीच्या मनात निराळ्या प्रेरणा कार्यरत असतात.