निकाल स्वतःच्या बाजूने लागावा, यासाठी केले कृत्य

चिक्कबळ्ळापुर (कर्नाटक) – स्वतःच्या बाजूने निकाल लागावा, यासाठी एका महिलेने न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी चिक्कबळ्ळापुर शहर पोलिसांनी मंजुळा (वय ६५ वर्षे) या महिलेला अटक केली आहे. चिक्कबळ्ळापुर शहरातील वलसण्णा गल्लीत रहाणारी मंजुळा हिने वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या खुर्चीवर मंत्रोच्चारासह पांढरी मोहरी टाकून करणी केल्याचा आरोप झाला होता. ही घटना न्यायालयातील ‘सीसीटीव्ही’मध्ये चित्रित झाली होती. या घटनेविषयी न्यायालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी नेत्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिक्कबळ्ळापुर शहर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी ‘कर्नाटक अमानवीय दुष्ट प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायदा-२०१७’च्या अंतर्गत आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या मंजुळाला न्यायालयात उपस्थित केले असता तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार