श्रीराममंदिरातील दान चोरीपेक्षा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून चौकशीची मागणी
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव सध्या श्रीराममंदिरातील देणग्यांच्या चोरीविषयी सातत्याने बोलत आहेत; पण वस्तूस्थिती अशी आहे की, उत्तरप्रदेशामध्ये जेव्हा जेव्हा समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेत होते, तेव्हा तेव्हा ‘वक्फ बोर्डा’त अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप बरेली येथील ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले, ‘‘सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्यपदी केवळ तत्कालीन अल्पसंख्याक व्यवहार, वक्फ आणि हज मंत्री आझम खान यांच्या पसंतीच्या लोकांचीच नियुक्ती केली जात होती. बोर्डाचे सदस्य किंवा पदाधिकारी यांनी त्यांच्या भागातील वक्फ भूमींची विभागणी केली आणि मालमत्तेचा अपवापर केला. जर वक्फ बोर्डाची योग्य चौकशी झाली, तर श्रीराममंदिराच्या देणगी चोरीपेक्षाही मोठा घोटाळा उघडकीस येईल.’’
या प्रकरणी मौलाना बरेलवी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !