Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

कर्णावती (गुजरात) – गुजरातमध्ये होणार्‍या भगवान जगन्नाथांच्या भव्य रथयात्रेला केवळ दोन दिवस उरले असतांना गुजरात आतंकवादविरोधी पथकाने सिद्धपूरमधून आतंकवादी संघटनेशी संबंधित ५ जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी चालू आहे. ते जैश-ए-महंमद या आतंकतवादी संघटनेशी किंवा इतर कोणत्याही संघटनेशी संबंधित आहेत का ?, हे निश्चित करण्यासाठी सखोल अन्वेषण चालू आहे. त्यांच्या व्यतिरिक्त बनासकांठा येथे आणखी २ व्यक्तींना कह्यात  घेण्यात आल्याचे वृत्त आहे. १६ जुलै या दिवशी कर्णावती, भावनगर, वडोदरा, पाटण आणि राजकोटसह अनेक शहरांमध्ये रथयात्रा होणार आहे.

संपादकीय भूमिका

  • अजूनही भारतात हिंदूंच्या धार्मिक यात्रा जिहादी आतंकवाद्यांच्या सावटात होतात, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
  • या आतंकवादामागे भारतातील जिहादी मानसिकतेचे मुसलमान आणि पाकिस्तान आहे, ही वस्तूस्थिती असतांना भारत त्यांच्या विरोधात कायमस्वरूपी कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !