श्री वैष्णोदेवी मंदिरात २० टनांपेक्षा अधिक बनावट चांदी अर्पण झाल्याचे प्रकरण
जम्मू – येथील श्री वैष्णोदेवीच्या मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या ५५० कोटी रुपयांच्या बनावट चांदीच्या प्रकरणात जम्मूच्या न्यायालयाने पोलिसांना संबंधित नोंदी न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने २९ जुलै या दिवशी होणार्या पुढील सुनावणीच्या वेळी अन्वेषण अधिकार्याला वैयक्तिकरित्या उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. श्री वैष्णोदेवीच्या मंदिरात भाविकांकडून २० टनांपेक्षा अधिक चांदी अर्पण करण्यात आली होती. याची बाजारपेठेतील किंमत ५५० कोटी रुपयांच्या आसपास आहे.
जेव्हा ‘श्राइन बोर्डा’ने ही चांदी वितळवण्यासाठी पाठवली, तेव्हा त्यात अवघी ५-६ टक्केच चांदी आढळून आली. उर्वरित भागात कॅडमियम आणि लोह यांसारखे धातू असल्याचे सांगण्यात आले, म्हणजेच बहुतांश चांदी ही बनावटच निघाली. हे प्रकरण उघड झाल्यानंतर जम्मू येथील अधिवक्ता दीपक शर्मा यांनी ९ मे या दिवशी पोलीस महानिरीक्षक (गुन्हे शाखा) आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा), जम्मू यांच्याकडे सविस्तर तक्रार देऊन गुन्हा नोंदवण्याची आणि या प्रकरणाच्या अन्वेषणाची मागणी केली होती. भाविकांनी मंदिरात अर्पण केलेल्या चांदीमध्ये भेसळ करण्यात आली आहे किंवा ती चांदी पालटण्यात आली आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. यातील गैरव्यवहाराची शक्यता पहाता त्यांनी या प्रकरणाच्या सविस्तर अन्वेषणाची मागणी केली होती. पोलिसांचे अन्वेषण या प्रकरणात पुढे सरकले नाही, तेव्हा त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि गुन्हा नोंदवून अन्वेषणाची मागणी केली. (हे पोलिसांना लज्जस्पद ! – संपादक)

ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक