भोजशाळेच्या परिसरात प्रत्येक शुक्रवारी दुपारी २ घंट्यांसाठी नमाजपठणासाठी जागा देण्याचा सरकारला आदेश

नवी देहली – मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देतांना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने भोजशाळा हिंदूंची असल्याचा निर्णय दिला होता. त्यास मुसलमानांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने या वेळी निर्देश दिले की, प्रत्येक शुक्रवारी दुपारी १ ते ३ या वेळेत भोजशाळेच्या परिसराच्या जवळ मुसलमानांना नमाजपठणासाठी एक योग्य मोकळी जागा उपलब्ध करून दिली जावी. यासह न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला इमारतीच्या सद्यःस्थितीत कोणताही पालट न करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ आठवड्यांनंतर होईल.
सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील पिठाने मुसलमान पक्षाच्या याचिकांवर नोटीस प्रसारित करत सांगितले की, सर्व पक्षांच्या सोयीनुसार लवकरच यावर सुनावणी होईल. या प्रकरणावर जलद निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !