चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

लालू प्रसाद यादव

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर जामीन संमत करणार्‍या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिल. तथापि प्रलंबित अपीलांची सुनावणी जलद गतीने घेण्यास उच्च न्यायालयाला सांगितले.

संपादकीय भूमिका

चीनमध्ये भ्रष्टाचार्‍यांना फाशी दिली जाते, तर भारतात भ्रष्टाचार करणार्‍यांना कायद्याच्या नावाखाली सर्व सुविधा आणि सवलती दिल्या जातात, हा न्याय नव्हे, अन्याय आहे !