फलकावर मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांचे चित्र !
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील गोवर्धन चौकाजवळ एका फलकावर समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आणि राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे गोल टोपी घातलेले दाखवून ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असे लिहिलेला फलक लावल्याचे दिसून आले. यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त झाले. यासह या फलकावर अखिलेश यादव यांनी केलेले ‘अयोध्येत रात्रीच्या अंधारात मूर्ती ठेवल्या गेल्या होत्या’, हे वक्तव्य छापण्यात आले आहे. यासह त्यांचे वडील मुलायम सिंह यादव यांनी पूर्वी केलेले ‘बाबरीसाठी अयोध्येत आणखी कारसेवकांना मारावे लागले असते, तर मारले असते’, हे विधानही छापले आहे. अखिलेश यादव यांनी राममंदिरात दान चोरी झाल्याचा आरोप प्रथम केला होता. त्याविषयी ते सात्याने आरोप करीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना प्रत्युत्तर देणारा हा फलक लावण्यात आला आहे.
समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र यादव यांनी या प्रकरणी आम्ही संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असे सांगितले.

भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !