चेंबूर येथे शाळेच्या बसगाडीवर झाड पडल्याचे प्रकरण
चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांना सादर
रस्ते विभाग आणि उद्यान विभाग यांना मोकळीक

मुंबई – शहरातील चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात शाळेच्या बसगाडीवर पिंपळाचे झाड पडले. या प्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यात झाडांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर देखरेख करणार्या सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड करण्याची शिफारस करण्यात आली आहे, तसेच झाडांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यपद्धत सिद्ध करून ती तातडीने लागू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत; मात्र या दुर्घटनेमध्ये रस्ते विभाग आणि उद्यान विभाग यांच्या अधिकार्यांना ‘क्लीनचीट’ (मोकळीक) दिली आहे.
१. संबंधित कंत्राटदाराने उत्खननाच्या वेळी आवश्यक दक्षता घेतली नसल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले. कामावर देखरेख करणार्या सल्लागार संस्थेनेही योग्य पर्यवेक्षण केले नसल्याचे नमूद करत दोघांवर आर्थिक दंडाची शिफारस करण्यात आली आहे.
२. अहवालानुसार दुर्घटनेपूर्वी उद्यान विभागाने संबंधित परिसराची वेळोवेळी पहाणी केली होती, तसेच मोसमी पावसाच्या आधी झाडांची छाटणीही केली होती. पर्जन्यजल वाहिनीच्या कामाच्या वेळी झाडांच्या सुरक्षिततेविषयी उद्यान विभागाने रस्ते विभागाला वारंवार सूचना दिल्याने या दुर्घटनेत उद्यान विभाग किंवा रस्ते विभाग यांचा प्रथमदर्शनी कोणताही दोष आढळत नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !