वृत्तवाहिनीने वृत्त दाखवल्यावर पालिकेला जाग !

मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध जुहूच्या समुद्रकिनार्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यात प्लास्टिक, थर्माकॉल, कपडे, पिशव्या, ओला कचरा आणि इतर घाणही होती. समुद्राच्या भरतीमुळे किनार्यावर मोठ्या प्रमाणात असा कचरा येतो; पण तो पालिका प्रशासनाकडून वेळेत उचलला गेला नाही. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दाखवल्यावर पालिका प्रशासन जागे झाले आणि त्यांनी कचरा उचलण्यास प्रारंभ केला. कचर्याचे प्रमाण पहाता ते अल्प वेळेत उचलले जाईल, अशी शक्यता अल्प आहे.
स्थानिक नगरसेविका सुधा सिंह म्हणाल्या, ‘‘कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळ आणि वाहनांची संख्या अपुरी आहे. यंत्रणा वाढवण्याची मागणी सातत्याने पालिकेकडे केली आहे. कचर्याचे प्रमाण अधिक असल्याने संपूर्ण किनारा एका दिवसात स्वच्छ करणे शक्य होणार नसून यासाठी नियोजनबद्ध मोहिमेची आवश्यकता आहे.’’
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !