कर्नाटक : प्रवीण नेट्टारू हत्या प्रकरण

मंगळुरू (कर्नाटक) – संपूर्ण कर्नाटक राज्याला हादरवून सोडणार्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदु संघटनेचे नेते प्रवीण नेट्टारू हत्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. अनुमाने ४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना ‘एन्.आय.ए.’च्या अधिकार्यांनी अटक केली आहे. नौशाद (वय ३२ वर्षे) आणि अब्दुल नासीर (वय ४१ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. केरळ आणि तमिळनाडू येथील गुप्त ठिकाणांवर एकाच वेळी धाडी घालून त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
२६ जुलै २०२२ या दिवशी सुळ्य तालुक्यातील बेळ्ळारे येथे दुकान बंद करून घरी परतत असतांना प्रवीण नेट्टारू यांची दुचाकीवरून आलेल्या मारेकर्यांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली होती. या दोघांच्या अटकेमुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या २३ वर पोचली आहे. अजून ५ आरोपी पसार आहेत.
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक