मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक

अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि मल्लिकार्जुन खर्गे

बेंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनतेमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणारी एक शक्तिशाली संघटना आहे. केवळ प्रसिद्धीसाठी संघाविरुद्ध बोलणे योग्य नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःचा मुलगा तथा कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे याला समज द्यावी, असे आवाहन कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी काँग्रेसचे नेते तथा प्रियांक खर्गे यांचे वडील मल्लिकार्जुन खर्गे यांना केले. ‘प्रियांक खर्गे यांच्या अशा विधानांमुळे काँग्रेस पक्ष आणि सरकार यांची मोठी हानी होईल’, अशी चेतावणीही स्वामीजींनी दिली.

स्वामीजी पुढे म्हणाले,

१. मोठ्या व्यक्तींवर टीका केल्यास विनामूल्य प्रसिद्धी मिळते. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी प्रियांक खर्गे अशी विधाने करत आहेत.

२. प्रशासनाकडे लक्ष देण्याऐवजी केवळ रा.स्व. संघाला लक्ष्य करणे, हा प्रियांक खर्गे यांचा स्वभाव बनला आहे. तो एक मानसिक आजार असू शकतो.