परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात, तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

भगवंताशी अनुसंधान

‘मी हे उद्या करीन’ आणि ‘भगवंता, उद्या हे माझ्याकडून करवून घे’ या दोन्हींत भेद आहे. यासाठी ‘हे भगवंता, उद्या आपल्याला हे करावयाचे आहे आणि ते तू माझ्याकडून करवून घे’, अशी प्रार्थना करावी. अनुसंधानाने सामर्थ्य निर्माण होते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

सद्गुरूंच्या आशीर्वादाचे महत्त्व

पैसे अशाश्‍वत आहेत. संतांनी दिलेला आशीर्वाद अखंड टिकणारा आहे. अखंड म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत टिकणारा आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे काही पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा महान हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतात ‘भारतरत्न’ सर्वोच्च पद आहे. जगात ‘नोबेल प्राईज’ सर्वोच्च पद आहे, तर सनातन उद्घोषित करत असलेली ‘जन्म-मृत्यूतून सुटका’ आणि ‘संत’ ही पदे ईश्‍वराच्या विश्‍वात सर्वांत महत्त्वाची आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘दहा सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा एका पेहेलवानात अधिक शक्ती असते. त्याप्रमाणे साधना न करता राष्ट्रकार्य करणार्‍यांपेक्षा राष्ट्रकार्य करणार्‍या भक्तामध्ये अनेक पटींनी अधिक शक्ती असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्‍वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्‍वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी अंकगणित, खगोलशास्त्र, वास्तूशास्त्र, आरोग्यशास्त्र, विमानउड्डाणाचे शास्त्र, नौकानयनशास्त्र इत्यादींच्या संदर्भात आधुनिक वैज्ञानिक उपकरणांविना मूलगामी शोध लावले . . . यासाठीच बहुतांशी वैज्ञानिक संशोधनांचे खरे जनक भारतीय ऋषीमुनीच आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले