पुणे येथील चतु:श्रृंगी मंदिरात नवरात्रोत्सवात महनीय व्यक्तींसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार !
नवरात्रोत्सवात भाविकांसाठी मंदिर २४ घंटे चालू रहाणार आहे. २ कोटी रुपये खर्च करून या वर्षी मंदिराच्या जीर्णोद्धाराचेही काम झाले आहे.
नवरात्रोत्सवात भाविकांसाठी मंदिर २४ घंटे चालू रहाणार आहे. २ कोटी रुपये खर्च करून या वर्षी मंदिराच्या जीर्णोद्धाराचेही काम झाले आहे.
समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यावरून लक्षात येते. गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा न होणे आणि पोलिसांचा अल्प झालेला धाक हे यामागील मुख्य कारण आहे !
कधी काळी संस्कार घडवणारी ही शाळा आज मात्र बेगडी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदुत्वावरच घाला घालत मुलींचीही लव्ह जिहादच्या दृष्टीने मानसिकता घडवण्याचा प्रयत्न करत आहे. याला वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे !
चैतन्य महाराजांनी त्यांचे इतर २ भाऊ आणि नातेवाइक यांसह घराच्या जवळून जाणारा रस्ता पोकलेनने अवैधपणे खोदल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी तातडीने अन्वेषणास प्रारंभ केला. तांत्रिक अन्वेषणातून ते कर्णावती येथील उनावा परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली.
धार्मिक कार्यासाठी कर्नाटक येथे नेण्याच्या निमित्ताने पुजार्यासह ७ शिष्यांचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रामू वळून, दत्ता करे, हर्षद पाटील यांना अटक केली आहे.
पुणे येथील बावधन परिसरामध्ये सकाळी ६.४५ वाजता हेलिकॉप्टर कोसळले. त्यामध्ये गिरीशकुमार पिल्लाई, प्रीतमचंद भरद्वाज आणि परमजीत यांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथील ‘ऑक्सफोर्ड गोल्फ कोर्स रिसॉर्ट’ येथे जात होते. बावधन परिसरात धुके असल्याने ते बराच वेळ आकाशामध्ये घिरट्या घालून शेवटी ते खाली कोसळले.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यासह विविध शहरांमध्ये बेकायदेशीर बनावट ‘कॉल सेंटर’वर धाडी घालून ५ संशयितांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला.
रस्त्याच्या कडेला बेडशिट (पलंगपोस) विक्री करणार्या विक्रेत्यांकडून १४ सहस्र रुपये हप्ता म्हणून घेतले.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून देशभरातील ३२ शहरांमध्ये कारवाई करण्यात आली.