दोडामार्ग तालुक्यात रस्त्यांची निकृष्ट कामे करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठीचे उपोषण दुसर्‍या दिवशी चालू

नवीन रस्ते खराब होणे, रस्त्याची बाजूपट्टी आणि पूल खचणे, असे प्रकार घडत आहेत. या सर्वांना कर्तव्याची जाणीव नसलेले ठेकेदार आणि विकासकामे चालू असतांना लक्ष न ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा उत्तरदायी आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरेल का ?

सातारा शहरातील काही भागांतील रस्त्यावरील बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले !

काही मासही झालेले नसतांना रस्त्यावरील खड्डे पुन्हा उखडले जाणे गंभीर आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांकडून पैसे वसूल करावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हीच जनतेची अपेक्षा !

सातारा शहरातील खड्ड्यामुळे युवकाचा मृत्यू !

अनेक दिवसांपासून पडलेला खड्डा न बुजवणारे प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? प्रशासनाने आतातरी रस्त्यात अन्यत्र कुठे खड्डे नसल्याची निश्चिती करावी.

नागपूर येथे केवळ २ मासांत रस्त्यांवर २ सहस्रांहून अधिक खड्डे !

रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये व्यय करूनही ठेकेदारांकडून त्यांचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे करण्यात येते. त्यामुळेच रस्त्यावर खड्डे पडतात; मात्र महापालिका प्रशासन अशा ठेकेदारांवर कोणतीही कठोर कारवाई करत नाही.

हरिद्वारमधील हरिपूर कला येथील रस्त्यांसह सप्त सरोवर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांमध्ये संताप !

कुंभसारख्या मोठ्या सोहळ्याची उत्तराखंड प्रशासनाने कशा प्रकारे सिद्धता केली आहे, हेच यातून दिसून येते. आता सरकारने यात हस्तक्षेप करून प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अधिवक्त्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र !

अनेक वेळा शासनाकडे लिखित मागणी करूनही पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूरकडे जाणारा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने येथील अधिवक्ता विजयकुमार नागटिळक यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिले आहे.

उंचगाव कमान ते आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा ! – करवीर शिवसेना

उंचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असून  गावात येणारा उंचगाव कमानीपासूनचा प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात.

सांताक्रूझ-ताळगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सांताक्रूझ आणि ताळगांव ग्रामस्थांची पाऊसकर यांच्या घरासमोर निदर्शने

अत्यंत खराब स्थितीत असलेला सांताक्रूझ ते ताळगाव रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी २६ जानेवारीला सांताक्रूझ आणि ताळगाव येथील ग्रामस्थांनी आल्तिनो, पणजी येथे निदर्शने केली.

असलदे येथील रस्त्याचे काम होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवगड येथील कार्यालयास टाळे ठोकण्याची चेतावणी

जनतेने आंदोलन केल्यावरच काम करायचे, अशी प्रशासनाची नवीन कार्यपद्धत रूढ झाली आहे का ? असा प्रश्‍न जनतेला पडल्यास चूक ते काय ?

काणकोण तालुक्यातील तिर्वाळ-मार्ली या रस्त्याला गोवा मुक्तीनंतर तब्बल ६० वर्षांनी संमती

मार्ली हा काणकोण तालुक्यातील अत्यंत मागास भागातील वाडा असून येथील विद्यार्थी, आजारी आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना येथील खड्डेमय रस्ता आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव यांमुळे पुष्कळ त्रास होतात.