अर्भक दगावले !
रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस भीषण होत असल्याचे उदाहरण ! आता तरी खड्डे न बुजवणार्या दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई केली जाणार का ?

वैजापूर – रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बसलेल्या हादर्यांनी गर्भवती महिलेची वाहनातच प्रसुती होऊन नवजात अर्भक दगावल्याची घटना वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
शिऊर बंगला येथील रहिवासी समीर शेख ४ ऑक्टोबरच्या दिवशी रात्री त्यांची पत्नी साजिया यांना प्रसुतीच्या कळा चालू झाल्यामुळे खासगी वाहनातून संभाजीनगर येथे घेऊन येत होते. या वेळी एका खड्ड्यात गाडी आदळल्यामुळे साजिया यांना जोराचा हादरा बसला. यातच त्यांची प्रसुती झाली; मात्र वेळेत रुग्णालयात न पोचल्यामुळे नवजात अर्भक दगावले.
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !