जामखेड (जिल्हा नगर) तालुक्यातील डोळेवाडी येथे पक्का रस्ताच नाही !

  • स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांची दयनीय अवस्था असणे चिंताजनक !
  • स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही भारतातील खेडेगावांमध्ये ही अवस्था आहे. यातून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे जनतेप्रतीचे दायित्व लक्षात येते. निवडणुका आल्या की, आश्वासनांचा पाऊस पाडायचा आणि निवडणूक झाल्यानंतर सोयीस्कररित्या ते विसरायचे, असेच आतापर्यंत घडत आले आहे.
डोळेवाडी, जामखेड तालुका येथील कच्चा रस्ता

नगर – शहर आणि महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची नेहमीच चर्चा होते; मात्र जामखेड तालुक्यातील खर्डा रस्त्यावरील डोळेवाडी आणि परिसरातील वाड्यांसाठी पक्का रस्ताच नाही. ग्रामस्थांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून आपली व्यथा मांडली; मात्र अद्याप याची कुणीही नोंद घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यामुळे ग्रामस्थांना खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागते. गावात रस्ता नसल्याने एस्.टी. आणि इतर वाहने गावात येत नाहीत. त्यामुळे वृद्ध नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, गरोदर माता आणि आजारी व्यक्ती यांचे हाल होत आहेत.