छत्रपती संभाजीनगर येथील ‘दामिनी पथका’कडे १२ दिवसांत २२ तक्रारी !

शाळा-महाविद्यालये येथील विद्यार्थिनी, युवती आणि महिला यांच्‍या अडचणी जाणून घेणे, तसेच रोडरोमियोंकडून होणारा त्रास अल्‍प करण्‍यासाठी वर्ष २०१७ मध्‍ये ‘दामिनी पथक’ स्‍थापन केले होते

आज ‘नो हॉँकिंग डे’ पाळा !

ध्‍वनीप्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्‍य यांची हानी होत असल्‍याने पोलिसांनी हॉर्न (भोंगा) न वाजवता या उपक्रमाला सकारात्‍मक प्रतिसाद देण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

इगतपुरी येथे गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या ३ जणांना मारहाण

पोलीस गोवंशियांची वाहतूक रोखू शकत नसल्‍यामुळे गोप्रेमींना गोवंशियांची अवैध वहातूक रोखावी लागते ! हे पोलिसांचे अपयशच आहे ! पोलीस त्‍यांचे कर्तव्‍य कधी बजावणार ?

मुसलमान मुलीच्या हिंदु प्रियकराची तिच्या भावाकडून निर्घृण हत्या !

‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करण्यासमवेत मुसलमान मुलींवर प्रेम असणार्‍या हिंदु मुलांचेही जीवन संपवले जात आहे. एरवी ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात अडकवू नका’, असा उपदेश देणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?

गोवा : केपे येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात चोरी

हिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! केपे तालुक्यातील गुडी-पारोडा येथील पर्वतावरील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात अज्ञात चोरट्यांनी घुसून दानपेटी बाहेर आणून फोडून रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली. काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नथुरामचा कबुली जबाब का जाळला ? – शरद पोंक्षे, प्रसिद्ध अभिनेते

नथुरामचा कबुली जबाब का जाळला गेला ? नथुराम गोडसेने जेव्‍हा पहिल्‍या दिवशी त्‍यांची जबानी दिली आणि न्‍यायाधीश तिथून निघून गेले. त्‍यानंतर तिथे उपस्‍थित असलेले पत्रकार जेव्‍हा बाहेर आले, तेव्‍हा त्‍यांच्‍यावर पोलिसांनी आक्रमण केले, त्‍यांना घेराव घातला. त्‍यांच्‍याजवळ असलेली सगळी कागदपत्रे, नथुरामचा जबाब हिसकावून घेण्‍यात आला.

कायद्याचे उल्लंघन करणार्‍या दोषी वाहनधारकांकडून ६८ लाख ५९ सहस्र ३६६ रुपयांचा दंड वसूल !

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या वतीने १ ते ३१ मे या कालावधीत मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ५ सहस्र ६८९ दोषी वाहनांवर कारवाई करण्‍यात आली आहे.

मुंब्रा येथील फरार आरोपी शाहनवाज खान याला अलीबाग येथे अटक !

भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन’ खेळांच्‍या माध्‍यमातून अल्‍पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर करणारा मुंब्रा येथील मुख्‍य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला ११ जून या दिवशी ठाणे पोलिसांनी अलीबाग येथून अटक केली आहे.

सामाजिक माध्‍यमातून जातीय-धार्मिक तेढ निर्माण केल्‍यास ५ वर्षांचा कारावास

१० जून या दिवशी शाहूपुरी पोलीस ठाण्‍यामध्‍ये शांतता समितीची बैठक घेण्‍यात आली. या बैठकीला शहरातील प्रतिष्‍ठित नागरिक, नगरसेवक आणि शांतता समितीचे सदस्‍य उपस्‍थित होते.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपणा सर्वांचे दायित्व ! – उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे

‘छत्रपती शिवरायांच्या अवमान केला; म्हणून संबंधिताच्या विरोधात कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद होऊन कमाल प्रभूलकर याला अटक केली होती.